अभ्यागत नोंदणी
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी ही नोंदणी सुविधा आहे. प्रवेशद्वारावरील QR कोड आपल्या मोबाईलने स्कॅन करून नोंदणी करता येते.
नोंदणी कशी करावी
- प्रवेशद्वारावरील QR कोड आपल्या मोबाईलने स्कॅन करा.
- साधा फॉर्म भरा — नाव, मोबाईल क्रमांक, कुणाला भेटायचं आहे आणि भेटीचा उद्देश.
- नोंदणीनंतर मिळालेला चेक-आउट टोकन जतन करा; परत जाताना गेटवर स्कॅन करा.
भेटीची वेळ
कृपया कार्यालयीन वेळेतच भेट द्या. शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद असते.
महत्त्वाची नोंद
आपली माहिती फक्त कार्यालयीन नोंदीसाठी वापरली जाईल.